नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना विधिवत पूजा नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर आणि त्यांच्या पत्नी वर्षाताई करंजकर यांच्या हस्ते संपन्न झाली. हा कार्यक्रम नाशिक पूर्व विभागातील मेन रोड येथील महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पूजेसाठी नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त श्रीकांत पवार, उपआयुक्त अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट, विभागीय अधिकारी राजाराम जाधव आणि अन्य अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेन रोड येथील गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर, नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालय, राजीव गांधी भवन येथे देखील गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी विधिवत पूजा केली. सर्व अधिकारी-कर्मचारी या महाआरती आणि पूजेत सहभागी झाले.
या वर्षी मेन रोड येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यात श्रीरामाच्या जन्माचा देखावा साकारण्यात आला आहे. आयुक्त अशोक करंजकर आणि अन्य अधिकार्यांनी या देखाव्याचे कौतुक करत त्याचा आस्वाद घेतला.