भारतीय क्रीडा दिन
२९ ऑगस्ट २०२४
प्रेस नोट
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक २९ ऑगस्ट २०२४ हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा निमित्त हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त सेवा, स्मिता झगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त २०२३-२४ यावर्षी नाशिक शहरातील विविध क्षेत्रातीलखेळाडूंना राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरीय पुरस्कार घेऊन गौरविण्यात आले त्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा यांचा स्मिता झगडे अतिरिक्त आयुक्त (सेवा )यांच्या हस्ते सत्कार करुन सन्मानीत करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास नितीन नेर उप आयुक्त( समाज कल्याण) , डॉ . मयुर पाटील उप आयुक्त (अतिक्रमण), सहाय्यक संचालक नगरनियोजन कल्पेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी सत्कार केला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा विभागाचे आनंद भालेराव, विरु कामे,आदीसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
नितीन नेर
उपआयुक्त (समाजकल्याण) नाशिक महानगरपालिका, नाशिक