नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने शहरातील एका दवाखान्यात छापा मारून अवैधरीत्या सुरू असलेले गर्भपात केंद्र उघडकीस आणले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महात्मानगर सारख्या उच्चभ्रू वस्तीतील पांड्या हॉस्पीटलमध्ये हा प्रकार मागील कित्येक वर्षापासून सुरू होता. मनपाच्या वैद्यकीय पथकाच्या छाप्यात अनेक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माता मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ही गंभीर बाब निदर्शनास आली.
याठिकाणी गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा मोठा साठा आढळून आल्याने तत्काळ पंचनामा करत अवैध गर्भपात केंद्र चालविणाऱ्या डॉ. आर.एम. पंड्या यांच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी अधिक माहिती दिली
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.