रात्री उशिरा दारू न दिल्याने हॉटेल मालकासह कामगारांना मारहाण. सात जणांवर कारवाई

www vb 37

पाथर्डी फाटा पासून अंबड गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील हॉटेल महाराजा मध्ये रात्री उशिरा दारू न दिल्याने सात ते आठ टवाळखोरांनी हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण केली..
रात्री उशिरा दारू न दिल्याने
टवालखोरांनी हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये घेत झाला असून या मारहाणीत हॉटेल मधील वेटर जखमी झाला आहे. या घटनेनंतर मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी सात संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामधील दोन संशयीतांचा शोध सुरू असल्याची माहिती एम आय डी सी चौकीचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे यांनी दिली आहे.
मंगळवारी बार मालकास आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनीष हिवाळे (26) विवेक वाघ (25) गणेश आहेर (26) सागर बाविस्कर (24) निखिल खैरनार (23) संजोग देसाई हे सर्व अंबड व सिडको येथील राहणारे आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply