महाराष्ट्रातील पहिला ‘ॲक्वाफेस्ट’ जल पर्यटनमहोत्सव जळगावमध्ये सुरु

₹15 Crore Investment Announced for Water Sports Tourism at Mehrun Lake - Minister Girish Mahajan

जळगाव: मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनासाठी 15 कोटींची गुंतवणूक**महाराष्ट्रात पर्यटन उद्योग वेगाने विकसित होत असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू करत आहे. महाराष्ट्रात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वनसंपदा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने पर्यटनासाठी मोठी संधी आहे. याच उद्देशाने राज्य सरकारने देशातील इतर राज्यांचा अभ्यास करून नवे पर्यटन धोरण आणले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या धोरणाच्या अंतर्गत जळगावातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी घोषणा ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली. ते जळगावातील मेहरूण तलावात झालेल्या राज्यातील पहिल्या तीन दिवसीय ‘अॅक्वाफेस्ट’ जल पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, MTDC चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंत्री महाजन यांनी जळगावातील पर्यटन स्थळांचे महत्त्व विशद केले आणि जल क्रीडा पर्यटन प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. तसेच, मेहरूण तलावाच्या चौपाटीच्या विकासासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा प्रकल्प फक्त जळगावकरांसाठीच नव्हे, तर इतर जिल्ह्यांतील आणि परदेशी पर्यटकांसाठीही एक प्रमुख आकर्षण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यभरातील पर्यटन विकासाचे प्रयत्न

महाराष्ट्राची 750 किलोमीटरची विस्तीर्ण समुद्रकिनारपट्टी पर्यटनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सिंधुदुर्गजवळील स्कुबा डायव्हिंग प्रकल्पामुळे जागतिक पर्यटकांचे लक्ष वेधले जाईल. या प्रकल्पात पर्यटकांना समुद्राच्या आतमध्ये जैव विविधतेचा अनुभव घेता येणार आहे. तसेच, सिंधुदुर्ग परिसरात पंचतारांकित हॉटेलची उणीव भरून काढत ताज हॉटेलच्या स्थापनेसाठी पायाभरणी करण्यात येणार आहे. याशिवाय, देशात पहिल्यांदाच “डेक्कन ओडिसी” नावाचे 24 तास सर्व सुविधांनी युक्त पर्यटन प्रकल्पही सुरु होणार असल्याचे पर्यटन मंत्र्यांनी सांगितले.

अॅक्वाफेस्टमध्ये थरारक अनुभव

अॅक्वाफेस्ट महोत्सवाच्या उद्घाटनानंतर मंत्री महाजन यांनी जल क्रीडांचा अनुभव घेतला. खासदार, आमदारांसह बोटीतून पर्यटनाचा आनंद घेतल्यावर, स्पीड बोटीचे स्टेअरिंग स्वतः हाताळत, ताशी 90 किमी वेगाने बोटीची तीन फेर्‍या मारून थरारक अनुभव घेतला.

Leave a Reply