शेतकऱ्यांसाठी खुशखबर: पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता लवकरच जमा होणार

images 25

देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 18 वा हप्ता जमा होणार आहे. आतापर्यंत 17 हप्ते योजनेतंर्गत वितरित करण्यात आले असून, शेतकऱ्यांना आतापर्यंत 34,000 रुपयांचा लाभ मिळाला आहे. आता शेतकरी 18 व्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहेत, जो ऑक्टोबर महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबरला जमा होणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात, ज्यात प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा असतो. आतापर्यंत 17 हप्ते योजनेत दिले गेले आहेत. पीएम किसान योजनेसंबंधी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

हा निधी रब्बी हंगामाच्या आधी जमा होणार असल्याने, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात याचा मोठा उपयोग होईल. रब्बी हंगामात लागणाऱ्या बी-बियाणे, खते आणि इतर शेतीसाहित्य खरेदीसाठी हा आर्थिक आधार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत साईटवर त्यांच्या खात्यातील अपडेट्स तपासण्याची आणि खात्याच्या स्थितीबाबत आवश्यक ती माहिती मिळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply