Panchavati Murder Case : पंचवटी येथील खून प्रकरणाचा अवघ्या ५ तासांत छडा, गुन्हेशाखेच्या युनिट क्र. १ ची प्रभावी कारवाई

Panchavati, Murder Case

पंचवटी पोलिसांची तत्परता; सीसीटीव्हीच्या मदतीने संशयिताला अटक

नाशिक Panchavati Murder Case, १३ फेब्रुवारी: पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला पकडले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Panchavati Murder Case गुन्ह्याची नोंद आणि तपासाची दिशा

पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड (पंचवटी पोलिस ठाणे) यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 103 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये एक संशयित इसम आढळून आला. पुढील तपासादरम्यान पोलिस अंमलदार विलास चारोस्कर आणि नितीन जगताप यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी संतोष रमेश अहिरे (वय ३२, रा. स्टेट बँक मागे, एरंडवाडी, पेठफाटा, पंचवटी, नाशिक) हा गुलाबबाग परिसरात लपून बसला आहे.

Panchavati Murder Case संशयित आरोपीला शिताफीने अटक

पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून संशयित आरोपीला पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. पोलिस पथकाने त्वरित कारवाई करत संतोष अहिरे याला शिताफीने अटक केली. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Panchavati Murder Case गुन्हे शाखेच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट क्र. १ नाशिक शहरच्या पथकाने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार:

  • पोलीस निरीक्षक: मधुकर कड
  • सहायक पोलीस निरीक्षक: हेमंत तोडकर
  • पोलीस उपनिरीक्षक: चेतन श्रीवंत
  • पोलीस हवालदार: प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, रवींद्र आढाव, योगीराज गायकवाड, महेश साळुंके
  • पोलीस नाईक: मिलिंदसिंग परदेशी, राहुल पालखेडे, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे
  • चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक: किरण शिरसाठ

नाशिक पोलिसांची जलदगती तपास प्रणाली प्रभावी

या कारवाईमुळे नाशिक पोलिसांची जलद आणि प्रभावी तपास प्रणाली अधोरेखित झाली आहे. सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे केलेली ही कारवाई नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.