भुसावळ मंडलात ‘एक झाड आईच्या नावावर’ वृक्षारोपण मोहिमेचे यशस्वी आयोजन

successful-tree-plantation-drive-one-tree-in-mothers-name-organized-by-bhusawal-division

भुसावळ (प्रतिनिधी )भुसावळ मंडलाने ‘एक झाड आईच्या नावावर’ या विशेष वृक्षारोपण मोहिमेचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट पर्यावरणाचे संरक्षण आणि वृक्षारोपणाबाबत जागरूकता निर्माण करणे हे होते.या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी भुसावळ मंडल रेल प्रबंधक इति पांडेय यांनी भुसावळच्या स्काउट गाईड मैदानात वृक्षारोपण केले. त्यांच्या सोबत अपर मंडल रेल प्रबंधक (तंत्रज्ञान) श्री एम. के. मीणा, सर्व शाखा अधिकारी आणि स्काउट गाईडचे सदस्य उपस्थित होते.मोहिमेच्या अंतर्गत, भुसावळ मंडलातील विविध स्थानक क्षेत्रांमध्ये, डेपो, वर्कशॉप, तसेच भुसावळ मंडल रेल्वे हॉस्पिटलमध्येही वृक्षारोपण करण्यात आले. यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणास हातभार लागणार असून, भविष्यातील पिढ्यांसाठी हरित क्षेत्र निर्माण करण्याचा संकल्प देखील या उपक्रमाद्वारे केला गेला आहे.ही वृक्षारोपण मोहीम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने भुसावळ मंडलाने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. तसेच, सामाजिक एकतेचा आणि सामूहिक प्रयत्नांचा आदर्श प्रस्तुत करणारी ही मोहीम यशस्वी झाली, ज्यात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply