कामगार नगर मधील एका 11 वर्षिय अल्पवयीन मुलीवर एका 19 वर्षिय तरुणाने, बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मुलिच्या आई वडीलांनी, सातपुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे उघडकीस आला आहे, गुन्हा दाखल होताच सातपुर पोलिसांनी सदर संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी केली असता या तरुणाने बलात्कार केल्याचे कबूल केले आहे..
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सातपुर मधिल औद्योगिक वसाहतीत कामगार नगर परीसरातील निगळ मळा परीसरात भाडेकरु म्हणून अनेक कुटुंबे रहातात, अशाच भाडेकरु म्हणून रहात असलेल्या 19 वर्षिय अंकुश चौधरी या तरुणाने, 11 वर्षिय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी, अल्पवयीन मुलीच्या पालकांनी सातपुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सदर तरुणाला सातपुर पोलिसांनी ताब्यात घेतले असुन, त्याच्यावर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बलात्कार प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजु पठाण हे पुढील तपास करीत आहेत..