नाशिक: नाशिक रोड परिसरातील दत्त मंदिर सिग्नल येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व नवनाथ ढगे यांनी केले. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या समाजबांधवांनी “धनगड” आणि “धनगर” या दोन जातीत केवळ शाब्दिक चुकीमुळे होणाऱ्या गैरसमजांवर आवाज उठवला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात, “धनगड” असा उल्लेख झालेल्या व्यक्तींवर अन्याय होत असून, त्यांना धनगर जातीचे प्रमाणपत्र देऊन समाजाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांनी राज्य सरकारने तातडीने हा प्रश्न सोडवावा अशी भूमिका मांडली.
यावेळी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी आंदोलनस्थळी हजर राहून परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.