अंमळनेर मंगळगृह मंदिराच्या विकासासाठी २५ कोटींचा मंजूर आराखडा

₹25 Crore Development Plan Approved for Amalneir's Mangal Graha Temple

अंमळनेर येथील मंगळगृह मंदिराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या विकास आराखड्याच्या माध्यमातून मंगळगृह मंदिराचा विकास शेगाव मंदिराच्या धर्तीवर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

मुख्यमंत्र्यांनी या ऐतिहासिक मंदिराचा विकास धार्मिक आणि पर्यटन दृष्टिकोनातून प्रभावीपणे करण्यावर भर दिला आहे. २४ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हा आराखडा अंमलात आल्यास मंदिर परिसराचा व्यापक विकास होईल आणि तेथे अधिक पर्यटकांना आकर्षित करता येईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply