मुंबई: शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी, डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबईतील महानगर न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने संजय राऊत यांना 15 दिवसांचा साधा कारावास आणि 25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
डॉ. मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता, ज्यामध्ये राऊत यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचा आरोप होता. न्यायालयाने या खटल्याचा निकाल गुरुवारी दिला, ज्यात राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेप्रमाणे, दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून वसूल केली जाईल.
संजय राऊत हे शिवसेनेच्या (यूबीटी) महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांच्या या शिक्षेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.