राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे, पक्षांची जोरदार तयारी सुरू

Devlali Assembly Constituency Witnesses Intense Race for Candidature: Multiple Aspirants and Political Tensions Rise Ahead of Elections

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांनी आपापल्या रणनीतींवर काम सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. नेत्यांचे दौरे, सभा, आणि बैठका वाढल्या असून, पक्षांच्या उमेदवारांनीही तयारीला वेग दिला आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे, आणि विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ आज मुंबईत दाखल झाले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांनी सायंकाळी 8 वाजता मुंबई विमानतळावर आगमन केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, पी. प्रदीप, आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

या भेटीदरम्यान, आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सुरक्षेच्या उपाययोजना, मतदार यादीचे पुनरावलोकन, मतदान केंद्रांची तयारी आदी बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. निवडणुकीच्या प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन आयोगाकडून देण्यात येईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यभरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, मतदारही या निवडणुकीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.

Leave a Reply