माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे दुःखद निधन

*काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांचे दुःखद निधन:*

धुळे, २७ सप्टेंबर २०२४: महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे आज सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

रोहिदास पाटील यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, आणि नातवंडे असा परिवार आहे. पाटील यांच्या निधनामुळे धुळे जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, आणि नागरिकांनी त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांची अंत्ययात्रा शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता धुळे येथील नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर येथील निवासस्थानापासून निघणार आहे. त्यानंतर एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शनिवार सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटीतील सुंदर सावित्री सभागृहात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन होणार असून, सर्व चाहत्यांना आणि नागरिकांना त्यांना अखेरचा निरोप देता येईल, अशी माहिती काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.

रोहिदास पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत समाजसेवेचा आदर्श ठेवला आणि अनेक महत्वाच्या पदांवर कार्य केले होते.

Leave a Reply