नवी मुंबईत बांगलादेशींचे अनधिकृत वास्तव्य, 7 जण ताब्यात

**Headline:** Fugitive Accused in Badlapur Child Abuse Case Arrested

नवी मुंबई: नवी मुंबईतील करावे गावात अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे राहत असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण कोणतेही अधिकृत कागदपत्र नसताना भारतात चोर मार्गाने प्रवेश करून येथे वास्तव्य करत होते.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी करावे गावात पहाटे पाच वाजता छापा टाकला. या छाप्यात चार पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान या सर्वजणांनी बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्र नव्हते.

सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत त्यांची भारतातील प्रवेशाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या घटनेने परिसरात काही काळ खळबळ उडाली आहे.

अवैध स्थलांतरितांच्या बाबतीत पोलिसांकडून सतर्कतेने कारवाई होत आहे, आणि अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षेचे उपाय अधिक कडक केले जाण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply