सर्वांनाच गरमागरम चहा पिण्याची तलप येत असते. मात्र चहासोबत काही गुणकारी औषधी गोष्टी टाकल्यास साथीच्या आजारापासून दूर राहणे शक्य आहे. त्याबाबत जाणून घेऊया.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
◆ चहा मध्ये आले किसून टाकल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे सर्दी, कफ यांसारख्या आजारांपासून दूर राहता येते.
◆ आले आणि तुळशीची पाने चहामध्ये वापरल्याने शरीराला आराम मिळतो. तसेच पचनक्रिया सुधारते.
◆ गवती चहा देखील शरीरास गुणकारी आहे. त्यामधील औषधी गुणांना ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो.
◆ काळी मिरी वा दालचिनी घातलेला चहा इन्सुलिन सेन्सिव्हिटी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतो.
◆ वेलची आणि जायफळ यांची पावडर करून ती चहा मध्ये वापरल्यास ताजेतवाने वाटते.