अभिनेता गोविंदाच्या घरात अपघात: चुकून बंदूक सुटल्याने गोविंदा जखमी

अभिनेता गोविंदाच्या घरात अपघात: चुकून बंदूक सुटल्याने गोविंदा जखमी

अभिनेता गोविंदा त्यांच्या घरी एक दुर्दैवी घटनेत जखमी झाले आहेत. गोविंदा बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटली, ज्यामुळे ती त्यांच्या पायाला लागली. त्यांना तातडीने क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

गोविंदाचे मॅनेजर शाही सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा पहाटे कोलकात्याला जाण्याची तयारी करत होते. कपाटात बंदूक ठेवत असताना ती चुकून त्यांच्या हातातून पडली आणि गोळी सुटली. यानंतर त्यांना पायाला जखम झाली.

गोविंदानेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आई-वडिलांचा आशीर्वाद आणि गुरुंच्या कृपेने मी सुरक्षित आहे. मला गोळी लागली होती, पण ती आता काढण्यात आलेली आहे. सर्वांच्या प्रार्थनांमुळे मी बरा होतो आहे.”

Leave a Reply