शिवसृष्टीच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

First Phase of Yeola Shivsrushti Project Inaugurated; 12-Foot Bronze Statue of Chhatrapati Shivaji Maharaj Unveiled

नाशिक: छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यात म्हटले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

शिवसृष्टी प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी दहा कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराचे दर्शन घडवणारी रचना साकारण्यात आली आहे. येथील प्रवेशद्वार सागवानी लाकडापासून बनवले असून, जांभ्या व काळ्या दगडांचा उपयोग करून शिवकालीन स्थापत्यशैलीचे सौंदर्य जपण्यात आले आहे. प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांची चित्रे, ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून ऐतिहासिक माहिती, आणि सेनापतींच्या शिल्पांची योजना करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीच्या ब्राँझ पुतळ्याचे उद्घाटन केले. महाराष्ट्रातील सिंहासनावर बसलेला सर्वात मोठा पुतळा म्हणून याला मान मिळाला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे संवर्धन पुरातत्व विभागाच्या माध्यमातून होणार असल्याची घोषणा केली.

मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले, याची आठवण करून दिली. महाराजांनी शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले होते, ज्यात आर्थिक पाठबळ आणि सुविधा दिल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित म्युरल्स राजस्थानमध्ये सध्या तयार होत आहेत.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, गायक आदर्श शिंदे, शाहीर प्रा. डॉ. गणेश चंदनशीवे यांच्यासह कलाकारांनी ‘सरनार कधी रण’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

Leave a Reply