पुण्यातील बोपदेव घाटात एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना घडली आहे, जिथे मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
घटना बोपदेव घाटातील निर्जन भागात घडली, जेथे फिरायला गेलेल्या या महिलेवर तिघांनी बलात्कार करून तिचे शारीरिक शोषण केले. सदर महिलेवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या गंभीर घटनेनंतरही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही,
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. महिलेच्या मित्राकडून दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या घटनेचा तपशील गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. बोपदेव घाटातील हा भाग निर्जन आणि कमी वर्दळीचा आहे.