खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मातोश्री रोहिणी प्रकाश वाजे यांचे आज शुक्रवारी राहत्या घरी निधन झाले.

WhatsApp Image 2024 08 30 at 12.53.26 12fe6618

ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांच्या पत्नी व शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभाचे खासदार राजाभाऊ प्रकाशभाऊ वाजे यांच्या मातोश्री रोहिणी प्रकाश वाजे यांचे आज शुक्रवारी राहत्या घरी निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या.आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती प्रकाश भाऊ वाजे आणि खासदार राजाभाऊ वाजे, सून दीप्ती वाजे, पुतणे, नाती जावई, असून संगमनेर नाका येथील अमरधाम स्मशानभूमीत शुक्रवारी सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply