Nashik Latest News : नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये तोफ गोळ्यांच्या सरावा दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सरावाच्या वेळी तोफ गोळा फायर करत असताना हा गंभीर अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, काल दुपारी सरावादरम्यान अचानक झालेल्या ब्लास्टमुळे दोन्ही जवानांना गंभीर दुखापत “Both soldiers suffered serious injuries due to the blast.” झाली होती. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या बाबत मृत्यूची नोंद देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
प्रशिक्षणादरम्यानची दुर्दैवी घटना
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार देवळाली तोफ फायरिंग सराव करत असताना अचानक ब्लास्ट होऊन जवान गंभीर जखमी झाले. लष्करी सरावादरम्यान या प्रकारच्या दुर्घटना अत्यंत दुर्मिळ असतात, मात्र या घटनेने संपूर्ण लष्करी तळावर शोककळा पसरली आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अपघाताची चौकशी सुरू केली असून, सुरक्षा उपाययोजना आणि प्रशिक्षण प्रक्रियेचा पुनरावलोकन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा
या घटनेनंतर लष्कराच्या सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळाची तपासणी केली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. लष्करी तळावर असे अपघात पुन्हा घडू नयेत म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना काटेकोरपणे पुन्हा तपासल्या जात आहेत.
हैदराबाद वरून प्रशिक्षणासाठी आले होते देवळालीत
नाशिक देवळाली लष्कराच्या विविध छावण्या असून या ठिकाणी देशातल्या कानाकोपऱ्यातून लष्करातील जवान तोफ गोळ्यांच्या प्रशिक्षणासाठी नाशिक देवळालीत येत असतात हे दोन युवक हैदराबाद होऊन आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.