Nashik Road : नाशिकरोड न्यायालयात वरिष्ठ स्तर न्यायालय आणि अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी अधिकारी व कर्मचार्यांच्या मासिक वेतन व न्यायालयास लागणार्या दैनंदिन गरजांचे खर्चासाठी राज्य सरकारने गुरुवारी अखेर मंजुरी दिली.
नाशिकरोड येथे सध्या कनिष्ठ स्तर न्यायालय मंजूर आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तर आणि जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अखत्यारीतील दावे या न्यायालयात दाखल होऊ शकत नव्हते. परिणामी पक्षकार आणि नागरिकांना यासाठी नाशिक न्यायालयात आपले दावे दाखल करावे लागत होते. ही सुविधा नाशिकरोड न्यायालयात मिळावी यासाठी नाशिकरोड बार असोसिएशनतर्फे गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यासाठी असोसिएशनचे पदाधिकार्यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे नियमित पाठपुरावा सुरू ठेवल्याने अखेर या प्रयत्नांना गुरुवारच्या कॅबिनेट मंत्री मंडळात यश मिळाले व विशेष अधिसूचना काढून या प्रकरणास मंजूरी दिली.
या कामी मंत्रालय स्तरावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस, सचिव अनिल ढिकले, सहसचिव विलास गायकवाड, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष पारिजात पांडे, अर्जुन टिळे, जिल्हा न्यायाधीश जगमलानी साहेब, कोर्ट मॅनेजर अशोक दारके, अॅड. विष्णु मानकर, कुणाल कटारे, बार कौन्सिल सदस्य अॅड. जयंत जायभावे, अॅड. अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितिन ठाकरे, सुप्रिम कोर्ट दिल्ली येथील अॅड. प्रवर्तक पाठक, अॅड. रत्नाकर गायकवाड, अॅड. रमेश मालपाणी, अॅड. सी.व्ही. पुंडे आदींचे बहुमाल सहकार्य लाभले. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुदाम गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या निर्णयाचे नाशिकरोड बार असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे नाशिकरोड न्यायालयात आता लवकरच वरिष्ठ स्तर न्यायालय व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज लवकरच सुरू होण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.यावेळी नाशिकरोड बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश गायकर, सचिव अॅड. सुनील शितोळे, सहसचिव अॅड. भिमाजी आरणे, खजिनदार अॅड. संग्राम पुंडे, जनसंपर्क सदस्य अॅड. अविनाश भोसले, ग्रंथपाल अॅड. दमयंती दोंदे, सदस्य अॅड. मनिषा बेदरकर, अॅड. महेश गायधनी, अॅड. प्रमोद कासार, अॅड. उमेश साठे, अॅड. एन.के. कोकाटे, अॅड. आत्माराम वालझाडे, अॅड. रमेश रसाळ, अॅड. संजयकुमार मुठाळ, अॅड. रामदास आहेर, अॅड. शरद हांडगे, अॅड. राजेंद्र लोणे, अॅड. गणेश मानकर, अॅड. दिपक ताजनपुरे, अॅड. विक्रम राव, अॅड. प्रतिमा भालेराव, अॅड. प्रिया बावीस्कर आदी उपस्थित होते.
…हे फायदे होणार
नाशिकरोड न्यायालयात वरिष्ठ स्तर न्यायालय व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी अधिकारी व कर्मचार्यांच्या मासिक वेतन व न्यायालयास लागणार्या दैनंदिन गरजांचे खर्चासाठी राज्य सरकारने गुरुवारी अखेर मंजुरी मिळाल्याने आता नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, सिन्नर, वावी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दावे या न्यायालयात दाखल होणार आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील दावे देखील आता नाशिकरोड न्यायालयात चालविले जाणार आहेत. त्यामुळे पैसे व वेळ यांची बचत होवून गतीमान न्यायदानास हातभार लागणार आहे.
अॅड. सुदाम गायकवाड,अध्यक्ष, नाशिकरोड बार असोसिएशन