Latest News: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद बोलावली असून, महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रिया, मतदानाची तारीख, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आणि मतमोजणीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
निवडणुका जाहीर होताच, महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहिता लागू होईल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासनाच्या कोणत्याही नवीन योजना, घोषणा किंवा प्रकल्पांची उद्घाटने रोखण्यात येतील.
महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. यामध्ये बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला किमान १४५ जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी या बहुमतासाठी जोरदार तयारी केली आहे.
राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी आधीच सुरू केली आहे. संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली जात आहे आणि प्रचारासाठी रणनीती आखली जात आहे.
आजच्या घोषणेनंतर, राज्यात निवडणुकीचे वातावरण तापणार असून, आगामी काही आठवड्यांत राजकीय हालचालींना वेग येणार आहे.