Latest News : महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने हे निर्णय घेतले आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी या निर्णयांचे स्वागत करत या सरकारने गेल्या अडीच वर्षांत २५० हून अधिक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वागत
मुंबईतील प्रवेशद्वारांवरील टोलमाफीच्या निर्णयाला मनसेने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मनसेने मुलुंड येथील टोलनाक्यासह राज्यभरातील टोलनाके बंद करण्यासाठी आंदोलने केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर हा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेलं शहानपण आहे,” असे म्हटले होते.
रामदास कदम यांनी राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेवर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाष्य करत म्हटले, “एखादी मागणी करणे आणि ती लावून धरणे यात खूप फरक आहे. राज ठाकरे स्पष्टवक्ते आहेत, आणि त्यांची देशात अशीच प्रतिमा आहे. त्यांनी चांगल्या कामाला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे. हा निर्णय उशिरा घेतला गेला नाही, उलट कौतुकास पात्र आहे.”
राजकीय वातावरण: महायुतीचे मनसेला जवळ करण्याचे प्रयत्न
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मनसेला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप मनसेने कोणत्याही युती किंवा आघाडीशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू आहेत.