नाशिकचा फुलबाजार फुलतोय ?

rrrs

नाशिकला धार्मिकनगरी, तंत्रनगरी,यंत्रनगरी म्हणून बघितली जाते. नाशिक शहराला हजारो मंदिराचा वारसा लाभला असल्याने रोजची सकाळ चैतन्यमय असते. ही चैतन्यमय सकाळ करण्यासाठी फुल बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते. अगदी पहाटेपासूनच नाशिककरांची फुले खरेदीसाठी गर्दी होत असते. त्यामुळे मागील काही वर्षात नाशिकचा फुलबाजार चांगलाच नावारूपास येत असल्याचे दिसते आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

विविध फुलांचे हार, तोरण अशा फुलांपासूनच्या विविध वस्तूंपासूननाशिकची बाजारपेठफुलत आहे. नाशिक जसे द्राक्ष, कांदा व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर तसा फुलांच्या व्यवसायातून कात टाकत आहे. नाशिक शहरात १५ हजाराहून अधिक नागरिक फुल व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करत आहेत, सर्वात महत्वाचे यात ५० टक्के महिला व्यवसायिक आहे. शहरात जवळपास चार कोटीहून अधिक उलाढाल फुल विक्री होते. गणेशवाडीत फुल बाजारभरतो.

images 1

नाशिकच्या फुलबाजारचा इतिहास

नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील गणेश वाडी परिसरात हा फुलबाजार भरत असतो. याच परिसरात मेनरोड, सराफ बाजार लागूनच गोदावरी नदी वाहत असते. नाशिकला मंदिराचा वारसा असल्याने गोदाकाठावर अनेक मंदिरे आजही सुस्थितीत उभी आहेत. त्यामुळे साहजिकच पूजा विधीसाठी फुल वाहण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. त्यामुळे याच गोदाकाठावर फुलबाजार सजल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे फुलबाजारचा इतिहास अनेक वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे नाशिकवर अनेक वर्ष मुगलांचे वर्चस्व होते. त्या काळात हा परिसर गुलाब, शेवंती आणि निशीगंधाच्या बागांनी बहरलेला होता. या बागांमुळे गुलशनाबाद अशी शहराची ओळख निर्माण झाल्याचा इतिहास सांगितला जातो. मात्र अनेकदा हाच फुलबाजार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे स्थानिक सांगतात. याच फुलबाजारामुळे स्थानिकांना रोजगार मिळत असून पहाटेपासून फुलबाजारत लगबग पाहायला मिळत असते.

Leave a Reply