Salman Khan : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, बिश्नोई गँगची धमकी गंभीर

baba-siddique-murder-salman-khan-security-increased-bishnoi-gang-threat

Latest News : मुंबईत माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर गँगस्टर बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, काही महिन्यांपूर्वी त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर बिश्नोई गँगच्या शूटरांनी रेकी केल्याची घटना समोर आली होती.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरु होती. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्या मैत्रीमुळे ही हत्या करण्यात आली असावी, अशी चर्चा आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी सुख्खा कालूया याला नवी मुंबई पोलीस आणि हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. त्याला पनवेलमध्ये आणल्यानंतर कोर्टात हजर केले जाणार आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव, सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर आणि पनवेलमधील अर्पिता फार्म हाऊसवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली केली आहे. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॅरिकेट्स लावून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश नाकारला जात आहे.