Latest News : गेल्या काही दिवसांमध्ये विमान उडवून देण्याच्या धमक्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे विमान कंपन्या आणि विमानतळ प्रशासनांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. या प्रकारच्या घटना अधिकच गंभीर बनल्या आहेत मागील तीन-चार दिवसांत तब्बल २० हून अधिक विमानांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या आल्या आहेत. या धमक्यांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानांचाही समावेश असून, काही विमानांचे मार्गही बदलावे लागले. यामुळे विमान कंपन्यांवर तसेच विमानतळ व्यवस्थापनांवर मोठा आर्थिक व वेळेचा बोजा पडत आहे. विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवावी लागत आहे आणि बॉम्ब शोधणाऱ्या पथकांना पाचारण करावं लागतं. मात्र, सर्व धमक्या खोट्या असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार, या धमक्या समाजमाध्यमांवरून दिल्या गेल्या आहेत आणि यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) चा वापर करण्यात आला आहे. तपास यंत्रणांनी या धमक्या देणाऱ्या अकाउंट्सचे IP अॅड्रेस शोधले असून, ते लंडन आणि जर्मनीतील असल्याचे समोर आले आहे. ही अकाउंट्स खोटी असल्याचं सिद्ध झालं आहे. X (पूर्वी ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा या धमक्यांसाठी सर्वाधिक वापर झाला आहे. गुप्तचर यंत्रणांनी X कडून या अकाउंट्सचा IP अॅड्रेस मागितला असून, ती अकाउंट्स तातडीने बंद करण्याची विनंती करण्यात आली आहे.
तपासात असेही समोर आले आहे . धमक्या देणारे व्यक्ती VPN चा वापर करून त्यांच्या ऑनलाइन ओळखी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि धमक्या देणाऱ्यांचा माग काढण्यासाठी तांत्रिक साधनांचा उपयोग केला जात आहे.