Nashik : रिक्षामध्ये सोन्याची लूट करणारे जाळ्यात: गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची मोठी कारवाई

Nashik: Gold Theft in Rickshaw Foiled; Crime Branch Unit 1 Makes Major Arrest

Latest News:शहरातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका लुटीच्या गुन्ह्यात गुन्हेशाखा युनिट क्र. १ च्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

फिर्यादी, जो एक सोने कारागीर आहे, रिक्षात बसलेले असताना रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी होळकर पुलाजवळ त्याच्याकडील सोन्याचे दागिने चोरले होते. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस उप-आयुक्त प्रशांत बच्छाव व सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.

पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना गुप्त माहिती मिळाली की, लुटीचा गुन्हा मोईन मेहबूब शहा आणि त्याच्या साथीदारांनी केला आहे. आरोपी सोन्याचे दागिने विकण्यासाठी के.टी.एच.एम कॉलेज परिसरातून गंगापुर रोडकडे जाणार होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून मोईन मेहबूब शहा (वय २७) आणि वसीम लतीफ शहा (वय २७) या दोघांना ताब्यात घेतले.

आरोपींकडून चोरीस गेलेले ३२.७२५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. एकूण ३,२९,३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ च्या पथकाने केली आहे.