आजचे राशिभविष्य
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024
अश्विन कृष्ण अष्टमी
राहुकाळ – दुपारी 1:30 ते 3
“आज उत्तम दिवस.गुरुपुष्यमृत, कराष्टमी
आजचे राशिभविष्य
आणि 24 ऑक्टोबर रोजी जन्म झालेल्यांची स्वभाव वैशिष्ट्य आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा:-
तुमच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमच्या भरपूर ओळखी असतात आणि समाजात मोठ्या प्रमाणावर येणे जाणे असते. श्रीमंत व्यक्तीशी विवाह होतो आणि त्यानंतर भाग्योदय होतो. खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यात तुम्ही अंतर ठेवतात. स्वतःकडे उत्तम गुण असतात मात्र ते दाखवण्याची संधी मिळणे महत्वाचे असते. बुद्धिमत्ता आणि समरणशक्ती उत्तम असते. इतरांना न दुखावण्याचा स्वभाव असतो. तुम्ही स्वतः कलाकार असून कलाप्रिय आहात. तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती, अंतर्गत आवाजाची देणगी आणि व्यवहारिकता आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे, मोहक आणि आकर्षक आहे. लोकांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटते. रूढी आणि परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना समाजापेक्षा वेगळ्या असतात. तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याकडे तुमचा कल असतो. तुमचे उद्दिष्ट काय आहे यावर लक्ष ठेवून ते साध्य करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. तुमचे वक्तृत्व चांगले असते. जीवनात तुम्हाला मानसन्मान मिळतो. विविध समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. मित्रांना मदत करण्यात तुम्हाला सात्विक आनंद मिळतो. धर्म आणि तत्वज्ञान या विषयांची आवड असते. तुमचे आयुष्य आरामदायक आणि सुखलोलूप असते. तुम्ही उच्च प्रतीचे कपडे आणि दागिने वापरतात. स्वतःच्या प्रेमासंबंधींबाबत तुम्ही संशयी असतात. प्रेमात तुम्ही सावधपणे पावले टाकतात. तुमच्यात अहंगंड असून कधीकधी तुम्ही स्वतःची मते इतरांवर लादतात.अनपेक्षितपणे पैसा मिळतो.पण बचत करण्याची प्रवृत्ती नसते. खर्चिक वृत्ती असते.तुमचे आयुष्य आरामदायक व सुखलोलुप असते.उच्च प्रतीचे कपडे व दागिने वापरता.समाज प्रिय असल्याने सतत पाहुण्यांचा ओघ घरी चालू असतो.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- निळा आणि गुलाबी.
शुभ रत्न:- पाचु, मोती, हिरा.
आजचे राशिभविष्य
मेष:- आज उत्तम दिवस.कौटुंबिक खरेदी होईल.घरातल्या सजावटीसाठी खर्च कराल.
वृषभ:- आज प्रसन्न रहाल.प्रवासातून लाभ होतील.भावंडांकडून भेटवस्तू मिळू शकते.
मिथुन:- मानसिक समाधान लाभेल.उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल.कौटुंबिक सौख्य लाभेल.संपत्ती वाढेल.
कर्क:- आज सुंदर दिवस आहे. मेहनत जास्त घेतल्यास कामे उत्तम कार्यसाध्य होईल.आत्मसन्मान राखा. स्वतःसाठी खरेदी होईल,मौज कराल.
सिंह:- आज मोह टाळा.अहंकार बाळगू नका.रुटीन चालू ठेवा.
कन्या:- आज मौल्यवान खरेदीचे योग. नवीन ओळखी होतील.मात्र मनात विनाकारण भय वाटेल.
तुळ:- आज नोकरी व्यवसायात उत्तम लाभ मिळेल.पतीची मर्जी राहील.मात्र आत्मविश्वास कमी पडू देऊ नका.
वृश्चिक:- आज विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.प्रवास आनंददायी होतील.
धनु:- आज स्त्रीधन वाढेल.अचानक लाभ होतील.मात्र वाहन चालवताना काळजी घ्या.
मकर:-आज कौटुंबिक सौख्याचा दिवस. लाभ होतील,खरेदी कराल.
कुंभ:- आज हाताखालचे कामगार मदत करतील.नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल.आरोग्य जपा.
मीन:- आज मुलांसाठी खर्च कराल. प्रेमात यश.विवाह इच्छुकांना छान समाचार मिळतील.कलाकार चमकतील.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.