गेल्या तीन वर्षापासून लोकसभा निवडणुकीची तयारी करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी सभागृह नेते दिनकर पाटील नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याच निश्चित केल असून मतदार संघातील प्रमुख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांच आयोजन दिनकर पाटील यांच्याकडून केलं जात आहे
लोकसभा निवडणुकीनंतरच दिनकर पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून आतापर्यंत तीन हजार प्रमुख लोकांच्या भेटी घेतल्या आहेत सातपूर तसेच आपले जन्मगाव आणि प्रभाग आठ मधील नागरिकांच्या भेटी व्हाव्या यासाठी जनसंवाद मेळावा आणि मिसळ पार्टीचे आयोजन शनिवारी बालाजी लॉन्स येथे करण्यात आलं होतं स्थानिक उमेदवार म्हणून माझ्या पाठीमागे उभे राहण्याचा आवाहन यावेळी दिनकर पाटील यांनी केलं पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष उमेदवारी करण्याचा देखील जाहीर केली आहे..
गेल्या वर्षापासून सातपूर सिडको भागातील अनेक प्रश्न जैसे थे असून बेरोजगारी औद्योगिक विकास यासारखे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी दिनकर पाटील यांना साथ देण्याचा आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस
अमोल पाटील यांनी केलं आहे..
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
यावेळी उपस्थित नागरिकांनी मिसळ पार्टीचा आस्वाद घेतला