बुधवार, 4 सप्टेंबर 2023. भाद्रपद शुक्ल प्रतिपदा
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहू काळ – दुपारी 12 ते 1.30
“आज उत्तम दिवस”
4 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐🎉🌹
तुमच्यावर हर्षल आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात आणि विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. तुम्हाला काही विलक्षण घटनांचा जीवनात अनुभव येतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे आणि व्यापारी वृत्ती आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि शास्त्रीय आहे. उत्साह, प्रगती आणि जोम ही तुमचे वैशिष्ट्ये आहेत. जीवनात अनेक चढउतार अनुभव येतात. कोणत्याही कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम नियोजन करतात. मानवतेच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला नाविन्य आणि प्रवासाची आवड असते. तुम्हाला जुन्या परंपरा आणि रूढी आवडत नाहीत. जीवनात सतत बदल असावा असा तुमचा विचार असतो. तुमचा मित्र परिवार सतत बदलत असतो. तुम्ही अहंकार आणि हट्टीपणा टाळला पाहिजे आणि डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये ठामपणे असतो. तुम्हाला आपल्या घराबद्दल आपलेपणा आहे परंतु ओढा नाही. तुम्ही चला व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आहात .घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. तुम्हाला अनेक गोष्टीत रस असतो व सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करण्यात हातखंडा असतो. टापटीप आवडत असली तरी स्वतः फारसे कष्ट करीत नाहीत.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार आणि शनिवार.
शुभ रंग:- तपकिरी, निळा आणि पांढरा.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे आणि मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज उत्तम आर्थिक लाभ होतील . अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत. नातेवाईकांशी हितगुज कराल.
वृषभ:- मैत्रिणींनो आज मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल.
मिथुन:- मैत्रिणींनो आज राग टाळा, कटू बोलणे टाळा. घरगुती वाद होऊ शकतात.
कर्क:-मैत्रिणींनो आज आर्थिक लाभ होईल. मात्र वाहन दुरूस्ती वर खर्च होईल.
सिंह:- मैत्रिणींनो कलाकार चमकतील. नेतृत्व गुण दिसून येतील..
कन्या:- मैत्रिणींनो आज उद्योग धंद्यात वाढ होईल. सुख लाभेल. संध्याकाळी अचानक लाभ होतील.
तुळ:-मैत्रिणींनो आज दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. कामात यश. संध्याकाळ आनंदी.
वृश्चिक:- मैत्रिणींनो दशम आणि लाभ स्थानी चन्द्र हर्षल शुभ योग आहे. प्रसन्न राहाल.लाभ होतील.
धनु:-मैत्रिणींनो आज कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. सहकारी मदत करतील.
मकर:- मैत्रिणींनो सकाळच्या ची सुरवात कंटाळवाणी राहील. दुपार नंतर कामाचा वेग वाढेल.
कुंभ:- मैत्रिणींनो संमिश्र दिवस आहे. सकाळ चे सत्रात पतिकडून लाभ होतील. संध्याकाळी अष्टम स्थानी चंद्र येत आहे. गुंतवणूक काळजीपूर्वक करा.
मीन:- मैत्रिणींनो आज आर्थिक उन्नती होईल.कनिष्ठ सहकार्य करतील.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.