नाशिकरोड – नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. या मोहिमेअंतर्गत नाशिकरोड पोलिसांनी बाभळेश्वर रोड, पळसे येथे अवैधरित्या विदेशी दारू विक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले असून ६३,३६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला
नाशिकरोड पोलीस ठाण्यातील एटीसी पथकाचे पोहवा विष्णु गोसावी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. संशयित आरोपी बाभळेश्वर रोड, पळसे येथे बेकायदेशीर विदेशी दारू विक्री करत असल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तत्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
आरोपी तुषार राधाकिसन शिंदे (वय २८, रा. बंगाली बाबा, गायखे मळा, पळसे) याच्या ताब्यातून विविध प्रकारची विदेशी दारू जप्त करण्यात आली. DSP Black Whisky: ०६ बॉक्स (प्रत्येकी ४८ बाटल्या, एकूण २८८ बाटल्या), किंमत ₹४०,३२०/-
OC Blue Whisky: ०३ बॉक्स (प्रत्येकी ४८ बाटल्या, एकूण १४४ बाटल्या), किंमत ₹२३,०४०/-एकूण मुद्देमाल: ₹६३,३६०/-असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर आरोपीविरुद्ध दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोह विजय टेमगर करत आहेत.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोहवा विष्णु गोसावी, पोह विजय टेमगर, संदीप पवार, पोह अविनाश देवरे, पोना हेमंत मेढे, पोशि सागर आडणे, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, रोहित शिंदे आदींच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली.