नाशिक -विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील १५ विधासभा निवडणुकीच्या कल हळूहळू येऊ लागले आहे. काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी महाविकास आघाडीवर असल्याचे चित्र आहे. पहिल्या फेरीपासून त्याची सुरुवात झाली आहे. या सर्व मतदार संघाचे अपडेट बघा…
जिल्ह्यात भाजपच्या सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, राहुल आहेर, दिलीप बोरसे हे आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे, सुहास कांदे आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, नरहरी झिरवाळ, नितीन पवार, दिलीप बनकर हे आघाडीवर आहेत. तर मालेगाव मध्य मध्ये आसिफ शेख आघाडीवर आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


