मुंबई: रविवारी रात्री शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक ताज लँड हॉटेल, मुंबई येथे पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्देशानुसार आयोजित या बैठकीला शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत चार महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.
चार ठरावांचा तपशील
- महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचे आभार मानण्याचा ठराव.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदनाचा ठराव.
- एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव.
- एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्याचा ठराव.
मंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांच्या गटनेतेपदी नियुक्ती व्हावी, असा प्रस्ताव मांडला, जो एकमताने मंजूर करण्यात आला.
अजित पवार गटाची बैठक
त्याआधी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची स्वतंत्र बैठक दुपारी पार पडली. या बैठकीत अजित पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर रात्री शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती जाहीर झाली.