कारने दिलेल्या धडकेत ३५ वर्षीय पल्सरस्वार ठार

35-year-old Pulsar rider killed in car collision

नाशिक – भरधाव इको कारने दिलेल्या धडकेत ३५ वर्षीय पल्सरस्वार ठार झाला. हा अपघात महामार्गावरील पाथर्डी फाटा ते लेखानगर दरम्यानच्या सहींसरोडवर झाला. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात कारचालाकविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आकाश चिंधा निकम (रा. सप्तश्रृंगी मंदिराजवळ, विनयनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत हवालदार गणपत फुलसुंदर यांनी फिर्याद दिली आहे. निकम शुक्रवारी (दि.६) सायंकाळी आपल्या पल्सर दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. पाथर्डी फाट्याकडून लेखानगरच्या दिशेने ते सर्व्हस रोडने प्रवास करीत असतांना विरूध्द दिशेने भरधाव येणा-या एमएच १५ एचक्यू ५५८८ या इको कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात निकम गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कारचालक नंदू रामदास शेटे (रा. मित्तल रो हाऊस, चेतननगर) यांच्याविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार साळी करीत आहेत.