मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात उपनगर पोलिसांची मोठी कारवाई

Suburban police take big action against manja sellers

नाशिक | उपनगर पोलिसांनी गांजा विक्री आणि बेकायदेशीर नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

उपनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की सैलानी बाबा चौक येथे एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सैलानी बाबा चौकाजवळ संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता २२ नायलॉन मांजाचे गट सापडले.

तपासादरम्यान आणखी दोघे आरोपी गजाआड

सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने स्वतःचे नाव प्रज्वल मुज (रा. मोरे मळा, नाशिकरोड) असल्याची माहिती दिली. पुढील चौकशीत त्याने हा माल आपल्या दोन मित्रांकडून मिळविल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ यश कांगणे (रा. अष्टविनायक नगर, नाशिकरोड) आणि शुभम गुजर (रा. मघवा चौक, नाशिकरोड) यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ९९ नायलॉन मांजाचे गट जप्त करण्यात आले.

८०,८०० रुपयांचा माल जप्त
एकूण १०१ नायलॉन मांजाचे गट, ज्यांची किंमत ८०,८०० रुपये आहे, पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त डॉ. मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इमरान शेख करीत आहेत.