आरोग्य विद्यापीठात ‘बिइंग ए टिचर’ विषयावर व्याख्यान संपन्न, शिक्षक हा राष्ट्र विकासाचा स्तंभ – लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन

WhatsApp Image 2024 09 07 at 11.49.18 53e5b8b9

नाशिक (दि. 6): महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शिक्षक दिनाच्या निमित्ताने ‘बिइंग ए टिचर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल मार्गदर्शन केले. “शिक्षक हा राष्ट्राच्या विकासाचा आधारस्तंभ आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विविध विद्याशाखांच्या शिक्षकांना संबोधित करताना, लेफ्टनन्ट जनरल कानिटकर यांनी सांगितले की, “शिक्षक समाजाचे निर्माता आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न पेरण्याचे आणि त्यांना प्रेरित करण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षणाचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे आणि यासाठी निष्ठा, शिस्त, आणि जिद्द महत्वाची आहे.” त्यांनी समाजाच्या विकासात शिक्षकांच्या भूमिका अधोरेखित करत राष्ट्राच्या प्रगतीशी ती जोडली.

कार्यक्रमास विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांसह अनेक अधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.

डॉ. स्वप्नील तोरणे यांनी या कार्यक्रमाचे समन्वयन केले. कार्यक्रमात विविध वैद्यकीय शाखांतील शिक्षकांनी सहभाग घेतला, तर अनेक शिक्षकांनी दुरस्थ माध्यमाद्वारे कार्यक्रमात सहभागी होऊन व्याख्यानाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. दिप्तेश केदारे, श्री. रोहित भोये, श्री. पुष्कर तर्‍हाळ, आणि श्री. नाना परभणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply