दि. २७ डिसेंबर २०२४ | नाशिक:
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी नदी Godavari river परिसराचा पाहणी दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे उपस्थित होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आयकॉनिक पर्यटन स्थळाचा विकास:
आयुक्तांनी गोदावरी नदीकाठ, अहिल्याबाई होळकर पुलाखालील पायऱ्या, रामकुंड परिसर, पंचवृक्ष परिसर, सितागुफा परिसर, काळाराम मंदिर आणि त्यालगतच्या शाही मार्गासह विविध ठिकाणांची पाहणी केली. नाशिकच्या ऐतिहासिक वारशाला “आयकॉनिक पर्यटन स्थळ” म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र शासनाच्या मंजूर प्रकल्पावर भर देण्यात येत आहे.
रामकाल-पथ प्रकल्पाच्या प्रमुख योजना:
- पर्यटनासाठी आधुनिक सुविधा:
लेझर शो
पाण्याचे कारंजे-फवारे
बोटींग सुविधा
तात्पुरते वस्त्रांतरगृह
पिण्याच्या पाण्याची सुविधा
पार्किंग व्यवस्था
नो व्हेईकल आणि नो प्लास्टिक झोन
- सांस्कृतिक महत्त्व जपण्यासाठी:
रामायणातील विविध प्रसंग दर्शवणारी भित्तीचित्रे
पुतळे, म्युरल्स, कमानी
आकर्षक विद्युत रोषणाई
दीपस्तंभ
स्थलिक अर्थव्यवस्थेला चालना:
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होणार असून, शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना समृद्ध अनुभव देण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
आयुक्तांचे मार्गदर्शन:
“नाशिकच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक ओळख देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, हा ‘रामकाल-पथ’ प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. प्रकल्पाची कार्यक्षम अंमलबजावणी ही आमची प्राथमिकता आहे,” असे आयुक्त मनिषा खत्री यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिकेच्या पुढाकाराने शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे.
He Pan Wacha : Five crore devotees will come to the Kumbh Mela, police estimate that 25 thousand security forces are expected