आजच्या ग्रहयोगांमुळे काहींना लाभ होईल, तर काहींना आव्हानांना सामोरे जावे लागेल. संमिश्र ग्रहमान आणि चंद्रस्थितीमुळे काही राशींसाठी दिवस अनुकूल, तर काहींसाठी संभ्रम निर्माण करणारा आहे. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी यांच्या मार्गदर्शनाने घ्या योग्य निर्णय.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Saturday , २८ डिसेंम्बर २०२४. मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी. शिशिर ऋतू. क्रोधी नाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०.
चंद्र नक्षत्र – अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ. वृश्चिक. (शूल योग शांती करून घ्यावी)
“आज वर्ज्य दिवस आहे.” Saturday शनी प्रदोष
मेष:- चंद्राचा मंगळाशी त्रिकोण शुभ योग्य आहे तर गुरू प्रतियुती, शनिशी केंद्र योग आहे. आज महत्वाची कामे नकोत. अष्टम स्थानी चंद्र आहे. शत्रू डोके वर काढतील.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. जोडीदाराचा सल्ला मानावा लागेल. संभ्रम निर्माण करणाऱ्या घटना घडतील.
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. प्रवास घडतील. विनाकारण वाद टाळा. आर्थिक लाभ होतील.
कर्क:- घरगुती काम पूर्ण होईल. लॉटरी मधून बरे लाभ मिळतील. अचानक धनलाभ संभवतो.
सिंह:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. नोकरीत त्रास होऊ शकतो. घरगुती कामे कराल.
कन्या:- आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील.
तुळ:- यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना चांगला दिवस आहे. वक्तृत्व चमकेल.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. भागिदरी व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. काही अप्रिय अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन बदलेल. हानी होऊ शकते.
मकर:- लाभ स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. जमीन व्यवसायात जपून निर्णय घ्या.
कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे. आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराचा सला मोलाचा ठरेल. कामाचा वेग वाढेल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. अति धाडस नको. दानधर्म करा. सिद्धी प्राप्त होतील. तीर्थाटन घडेल.
कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521