भिषण अपघातात तीन युवक ठार, तवेरा चालक फरार

वणी (नाशिक): वणी येथून निफाड तालुक्यातील कारसूल येथे जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव वेगात असलेल्या तवेरा कारने धडक दिल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा दुर्दैवी अपघात शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अपघाताची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश रमेश हिलीम (वय 23), विजय रमेश हिलीम (वय 16) आणि गौरव तुकाराम पवार (वय 20), हे तिघे युवक कारसूल, तालुका निफाड येथील रहिवासी होते. हे युवक MH 15 BA 2229 क्रमांकाच्या दुचाकीवरून वणीहून कारसूल येथे जात होते. याच दरम्यान MH 19 AP 9933 क्रमांकाची तवेरा कार मागून भरधाव वेगात आली आणि या दुचाकीला जोरात धडक दिली.

तिघांचा जागीच मृत्यू
या भिषण धडकेत तिघेही युवक जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तवेरा कारचालक अपघातानंतर जखमींना मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला. तिन्ही युवकांना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

तवेरा चालकावर गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी शरद माधव पवार (रा. कारसूल) यांनी तक्रार दाखल केली असून, तवेरा कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply