Shivkal calendar”शिवसेनेच्या वतीने शिवकाल दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन, योगेश गाडेकर यांचे विशेष योगदान”

Shivkal Calender 2025 prakkashan

शिवसेनेच्या वतीने संपूर्ण शिवकाल उलगडून दाखविणारी शिवकाल दिनदर्शिका (Shivkal calendar0 २०२५ चे प्रकाशन, विधानसभा समन्वयक योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचे योगदान

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिकरोड (प्रतिनिधी): शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि खासदार संजयजी राऊत यांच्या हस्ते आज मातोश्री मुंबई या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शिवकाल दिनदर्शिका (Shivkal calendar) २०२५ चे प्रकाशन करण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या दिनदर्शिकेची संकल्पना युवा पदाधिकारी योगेश गाडेकर यांच्या मंथनातून साकारली गेली आहे.

“शिवसेनेच्या वतीने शिवकाल दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन, योगेश गाडेकर यांचे विशेष योगदान”

या विशेष दिनदर्शिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रत्येक तारखेला घडलेले कार्य आणि ऐतिहासिक प्रसंग सुसंगतपणे दिले आहेत. दिनदर्शिकेतील माहिती तंतोतंत ऐतिहासिक घटना व कार्ये यावर आधारित आहे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी या दिनदर्शिकेचे अवलोकन केल्यानंतर त्यावर समाधान व्यक्त करताना सांगितले की, “हा उपक्रम भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.” त्याचबरोबर त्यांनी युवा पदाधिकारी योगेश गाडेकर यांचे कौतुक करत या अभिनव उपक्रमासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दिनदर्शिका तयार करण्यासाठी तीनशे पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण प्रसंग आणि घटनांचे संकलन श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशनचे संचालक अंकुर काळे यांनी केले आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो आणि ऐतिहासिक प्रसंगांचे रेखाटन ज्येष्ठ शिवसैनिक आणि चित्रकार रमेश जाधव यांनी स्व-हस्ते केले आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत, खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ताजी गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, महानगर प्रमुख विलास शिंदे, उपजिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, संजय चव्हाण, राजेंद्र देसाई, मसूद जिलानी उपस्थित होते.

शिवकाल दिनदर्शिका २०२५ यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या योगदानाचा सखोल अभ्यास आणि त्यांची प्रेरणा घेणारी एक महत्त्वपूर्ण कृति तयार झाली आहे, जी भविष्यात अनेकांना प्रेरणा देईल.