नाशिकरोडच्या प्रलंबित समस्यांवर तोडगा काढा: उत्तुंग झेपचे रोहन देशपांडे यांची प्रशासनाला मागणी

Resolve pending Nashik road issues: Uttung Zep's Rohan Deshpande demands administration

नाशिकरोड (प्रतिनिधी)
नाशिक रोड विभागीय कार्यालयात उत्तुंग झेप फाउंडेशनचे अध्यक्ष व भाजप सदस्य रोहन देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली. यावेळी समस्यांवर निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड विभागात अनेक महिने प्रलंबित असलेल्या समस्यांचा सविस्तर पाढा यावेळी वाचण्यात आला. यामध्ये मुख्यत्वे खालील समस्या समाविष्ट होत्या:रस्त्यांवरील खड्डे आणि डांबरीकरण रखडलेले काम,अनधिकृत फेरीवाल्यांची वाढलेली संख्या,सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरावस्था,पुसलेले पांढरे पट्टे आणि रेडियम अभावामुळे होणारा वाहतूक अडथळा,फुटपाथवरील अतिक्रमण आणि वाहतूक बेटांची दुरवस्था,बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे, उद्यानांतील अस्वच्छता व दैनंदिन देखभाल अभाव,वास्को चौक, गायकवाड मळा, मीना बाजार, छत्रपती शिवाजी चौक येथे रहदारीचे प्रश्न. उपस्थित करण्यात आले.

चर्चेदरम्यान आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, अतिक्रमण, वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लवकरच काम सुरू होईल, असा विश्वास विभागीय अधिकारी,चंदन घुगे यांनी व्यक्त केला.

जर वेळेत कामे मार्गी लागली नाहीत, तर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन पुढील कारवाईचा इशारा रोहन देशपांडे यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

यावेळी शिष्टमंडळासोबत हेमंत गाडे, जमदाडे, अमृत शिरसाठ, अखिल कादरी, आकाश शिलावत, अथर्व पाठक, विनीत सातपुते, हेमंत जाधव, प्रियंका पटेल, सविता सोनवणे, हंसा भगत यांसह नागरिक उपस्थित होते.