नाशिक पुणे महामार्गावर वाहनाच्या टपावर स्टंट करणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई – सोशल मीडिया (social media) व्हिडिओ व्हायरल
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक : सोशल मीडियावर (social media) व्हायरल होण्याच्या नादात जीवाशी खेळ करणाऱ्या तरुणाला उपनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. जय भवानी रोड, भालेराव मळा येथील नवीन युसुफ शेख (वय 22) हा तरुण नाशिक-पुणे महामार्गावर चालत्या चारचाकी वाहनाच्या टपावर बसून रिल्स तयार करत होता. त्याचा हा धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाल्यानंतर उपनगर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षकांचा वेगळा पवित्रा
उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, नवीनला तातडीने चौकशीसाठी बोलावले. स्टंटच्या नादात सार्वजनिक सुरक्षिततेचा फज्जा उडवणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत कडक कारवाई केली.
धोकादायक स्टंटचा फटका तरुणांना
रिल्स बनवण्याच्या नादात अनेक तरुणांनी आपला जीव गमावल्याच्या घटनांवर पोलिसांनी पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. धोकादायक स्टंट करत इतरांच्या जीवितालाही धोका पोहोचवणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
गुन्हा दाखल
19 जानेवारी रोजी रात्री 11:30 वाजता नवीन युसुफ शेखविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्टंटबाजीच्या नादात जीवाशी खेळणाऱ्या तरुणांना इशारा मिळाला असून पोलिसांनी अशा प्रकारांवर कडक नजर ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
“सोशल मीडिया व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळणे महागात पडू शकते,” असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिला आहे.