नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण Atikraman विभागाने सिडको आणि मेनरोड परिसरात अनधिकृत विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली. तीन ट्रक साहित्य जप्त; वाहतूक कोंडी आणि अपघात कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सिडको: नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण Atikraman विभागाने सिडको परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत कठोर कारवाई केली. रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत हातगाड्या, टपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर दणक्यात कारवाई करत तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
वाहतूक कोंडीला दिलासा
सिडकोतील त्रिमूर्ती चौक आणि पाथर्डी फाटा परिसरातील गामने मळा मुख्य रस्त्यांवर अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते आणि गाड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती. अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने कारवाई हाती घेतली.
अतिक्रमण Atikraman विभागाची धडक कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण Atikraman विभागाने जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली. या मोहिमेत निखिल तेजाळे, तानाजी निगळ, जीवन ठाकरे, मधुकर गायकवाड आदी कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. अनधिकृत गाड्या, टपऱ्या, फळभाज्या विक्रेते आणि अन्य साहित्य जप्त करून अडचणी दूर करण्यात आल्या.
मेनरोड परिसरातही अतिक्रमण हटविले
मेनरोड, एमजी रोड, चांदवडकर लेन, शालीमार परिसरात कपडे विक्री करणाऱ्या हातगाड्या, भांडी विक्रेते आणि अन्य अनधिकृत व्यवसायांवरही कारवाई करण्यात आली. पश्चिम विभागप्रमुख प्रवीण बागुल यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली.
जप्त साहित्याची यादी
या कारवाईत प्लास्टिक खुर्च्या, स्टील टेबल, लोखंडी जाळ्या, कपडे, छत्र्या, भांडी, प्लास्टिक कॅरेट, आणि इतर साहित्य जप्त करून आडगाव गुदामात जमा करण्यात आले.
महापालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे रस्त्यालगत अतिक्रमण करणाऱ्यांना धडा मिळाला असून, वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे.