सातपूर : टाकळीरोडवर गुटख्याचा मोठा साठा जप्त, १३.५ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला हस्तगत
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सातपूर शहरातील टाकळीरोड परिसरात गुटखा आणि पानमसाल्याची विक्री अद्याप चोरी-छुप्या मार्गाने सुरू असल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध Food and प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे काठे मळा येथील एका गोडावूनवर छापा टाकून तब्बल १३.५७ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.
गुप्त माहितीवर कारवाई
अन्न सुरक्षा Food and Drug अधिकारी सुवर्णा महाजन, संदीप तोरणे, अश्विनी पाटील आणि सुहास मंडलिक यांच्या पथकाने टाकळी रोडवरील काठे मळा परिसरातील सर्व्हे नं. ३८०/१ येथील संशयित शकील अन्सारीच्या गोडावूनवर छापा मारला. गोडावूनची झडती घेतल्यावर तिथे मोठ्या प्रमाणात पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची गोदामात साठवणूक असल्याचे निष्पन्न झाले.
संपूर्ण साठा सिलबंद
अन्न सुरक्षा Food and Drug अधिकाऱ्यांनी गोडावूनमधील १३ लाख ५७ हजार ४२० रुपये किमतीच्या प्रतिबंधित पानमसाल्याचे नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त केला आणि गोडावून सील केले. यासंदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्यात शकील अन्सारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग
या मोहिमेत सहआयुक्त महेश चौधरी, सहायक आयुक्त विनोद धवड आणि मनिष सानप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे शहरातील गुटख्याच्या अवैध विक्रीला चाप बसण्याची अपेक्षा आहे.