कॉम्प्युटर, लॅपटॉप व प्रिंटर्सची परस्पर विक्री
नाशिक : नाईस कॉम्प्युटरचे मालक गिते यांची तब्बल १८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक(Fraud) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर रोडवरील पारख दाम्पत्याने विश्वास संपादन करून लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि इतर वस्तू घेतल्या. मात्र, त्या वस्तू परस्पर विक्री करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मयूर पारख व पूजा पारख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रीसाठी दिलेल्या प्रिंटर्सचाही गैरवापर
गिते यांनी पारख यांना वापरण्यासाठी एचपी कंपनीचे स्मार्ट टँक ७५० ऑल इन वन मॉडेलचे चार प्रिंटर आणि स्मार्ट टँक ६७५ ऑल इन वन मॉडेलचे दोन प्रिंटर असे एकूण सहा प्रिंटर्स दिले होते. मात्र, पारख दाम्पत्याने हे प्रिंटर्स परस्पर विकून गिते यांची फसवणूक (Fraud)केली.
व्यावसायिकांच्या विश्वासाला तडा
ही घटना नाशिकमधील व्यावसायिकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. व्यावसायिकांनी आपल्या वस्तू भाडेतत्त्वावर किंवा वापरण्यासाठी देताना योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.