नाशिक रोड रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी अटकेत

nashikroad railway station mobile chor

नाशिक रोड, प्रतिनिधी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

रेल्वे पोलिसांनी प्रवाशांचे मोबाईल लांबविणा-या मालेगाव येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत केले. पोलिसाच्या गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केली.

पोलिसांनी सांगितले की, यवतमाळ येथील अमोल अमोल मधुकर राजूरकर (30) हा महाविद्यालयीन विद्यार्थी पाच दिवसापूर्वी सेवाग्राम एक्सप्रेसने नाशिकरोड ते शेगाव प्रवास करण्यासाठी गाडीत चढत होता. गर्दीचा फायदा घेऊन त्याच्या खिशातून चोरांनी मोबाईल लांबवला. गुन्ह्याचा तपास करीत असताना लोहमार्ग पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संतोष उफाडे पाटील,विलास इंगळे, आरपीएफ आरक्षक मनीष कुमार, सागर वर्मा यांना रेल्वे स्थानका फलाट क्रमांक एकवर शेख मुजमिल अब्दुल गणी (वय 22) व करीम खान अब्दुल्ला खान (वय 23) हे दोन संशयित दिसले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे समजले. त्यांच्याकडून चोरी गेलेला मोबाईल व कामयानी एक्सप्रेस मध्ये चोरलेला दुसरा मोबाईल मिळून आला. दोन्ही मोबाईल पोलिसांनी जप्त केले.

या कामगिरी बाबत पोलीस निरीक्षक सचिन बनकर, उपनिरीक्षक चंदन साखला यांनी गुन्हे शाखेचे अभिनंदन केले.

Leave a Reply