Mahakumbh 2025: महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ डार्क वेबवर विक्री – महाराष्ट्रातील दोन आरोपी अटकेत

Mahakumbh 2025: Shocking Case of Women's Bathing Videos Sold on the Dark Web – Two Accused from Maharashtra Arrested

प्रयागराज | Mahakumbh 2025 – महाकुंभमेळ्यात (Mahakumbh 2025) महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ चोरीने तयार करून ते डार्क वेबवर विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील दोन आरोपी महाराष्ट्रातील आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Mahakumbh 2025 : महाराष्ट्रातील आरोपी कोण?

  1. प्राज पाटील (सांगली, शिराळा) – गुजरात पोलिसांनी अटक
  2. प्रज्वल तेली (लातूर) – गुजरात पोलिसांकडून ताब्यात

याशिवाय, तिसरा आरोपी प्रयागराजचा चंद्रप्रकाश फुलचंद असून, तो देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे.

Mahakumbh 2025 : व्हिडिओ कसा विकला जात होता?

  • आरोपींनी महाकुंभमधील महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ तयार करून डार्क वेबवर विकले.
  • हे व्हिडिओ टेलिग्रामवर खास ग्रुपमध्ये शेअर करून विक्री केली जात होती.
  • सदस्यत्वासाठी 2,000 ते 4,000 रुपये आकारले जात होते.
  • गुजरात आणि महाराष्ट्रातील हॉस्पिटल, मॉलमधील महिलांचेही व्हिडिओ चोरीने तयार करून विक्री केली जात होती.
  • लातूर येथून परदेशातून पैसे घेतल्याचा धागा पोलिसांना सापडला.

गुन्ह्याची व्याप्ती – 13 एफआयआर दाखल

  • या प्रकरणात गुजरात आणि प्रयागराजमध्ये 2 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
  • एकूण 13 एफआयआर नोंदवले गेले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

सीसीटीव्ही हॅक करून महिलांचे व्हिडिओ चोरी

या टोळीने गुजरातच्या स्त्री रुग्णालय तसेच सार्वजनिक ठिकाणांचे सीसीटीव्ही हॅक करून महिलांचे व्हिडिओ तयार केले. त्यानंतर, हे व्हिडिओ डार्क वेब, यूट्यूब आणि टेलिग्रामवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले गेले.

पोलिस तपास सुरू

गुजरात पोलिसांच्या सायबर सेलकडून तपास सुरू असून, व्हाट्सअॅप आणि टेलिग्रामवरील व्यवहारांवर लक्ष ठेवले जात आहे. यामध्ये लातूरमधील आरोपी प्रज्वल तेली परदेशी हॅकर्सच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे.

महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण
डिजिटल गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी
सायबर सेलकडून तपास अधिक गतीमान