INDVSPAK: विरुद्ध पाकिस्तान या बहुचर्चित सामन्यात टीम इंडियाने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याला सात विकेट्सनी धूळ चारत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार विजय मिळवला. या विजयामुळे भारताने उपांत्य फेरीत स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, न्यूझीलंडनंतर भारताकडून झालेल्या पराभवामुळे यजमान पाकिस्तानचे आव्हान गट फेरीतच संपुष्टात आले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
INDVSPAK: आयआयटी बाबाची भविष्यवाणी फोल ठरली!
या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर आयआयटी बाबा नावाच्या एका स्वयंघोषित ज्योतिष्याने दावा केला होता की, “कोहली कितीही ताकद लावू देत, भारत कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकणार नाही!” मात्र, प्रत्यक्ष सामन्यात भारताने पाकिस्तानला सहज नमवत या भविष्यवाणीला सपशेल खोटे ठरवले.
INDVSPAK : विराट कोहलीचा तडाखेबंद शतकाने पाकिस्तानचा पराभव
विशेष म्हणजे, ज्याचं नाव घेऊन बाबा भविष्यवाणी करत होता, तोच विराट कोहली या सामन्याचा नायक ठरला. त्याने शानदार शतक झळकावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोहलीच्या अप्रतिम खेळीमुळे भारताने सहज लक्ष्य गाठले आणि पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला.
INDVSPAK सोशल मीडियावर आयआयटी बाबाची खिल्ली
सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर आयआयटी बाबाची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. “आयआयटी बाबा म्हणजे ढोंगी!”, “फेक बाबा एक्सपोज झाला!”, अशा प्रकारच्या कमेंट्सनी सोशल मीडिया गजबजून गेला आहे. अनेकांनी त्याच्यावर मीम्स तयार करत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
पॉइंट टेबलमध्ये भारताची मोठी झेप
या विजयासह टीम इंडिया आपल्या गटात पहिल्या स्थानावर पोहोचली असून उपांत्य फेरीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता चाहत्यांची नजर पुढील सामन्यांकडे लागली आहे. टीम इंडियाच्या या विजयाने क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे!