नाशिकरोड विभागात श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त रूट मार्चचे आयोजन

nashikroad root march

नाशिक: श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त नाशिक रोड विभागात शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशानुसार, पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या उपस्थितीत नाशिक रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

सदर रूट मार्च भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ते बिटको चौक, ते महात्मा गांधी पुतळा, देवळाली गाव, ते छत्रपती मैदान, देवळाली गाव या मार्गावर पार पडला. यावेळी नागरिकांमध्ये शांतता व सुरक्षेचा संदेश देण्यात आला.रूट मार्चमध्ये नाशिक रोड पोलिस स्टेशनचे वपोनी अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे, तसेच उपनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वपोनी जितेंद्र सपकाळे हे उपस्थित होते. यासोबतच 10 एपीआय/पीएसआय, आरसीपी पथकाचे 20 पोलिस अमलदार, एसआरपीएफ प्लटूनचे 01 अधिकारी आणि 20 पोलिस अमलदार, 45 पोलिस कर्मचारी आणि 50 होमगार्ड यांचा सहभाग सहभागी होते.

Leave a Reply